वडनेर दुमाला व विहितगाव परिसरात आ. सरोज आहिरे यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी मा. नगरसेवक प्रभाकर पाळदे, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, गणेश खर्जुल, संपत पाळदे, अरुण पोरजे यांच्यासह मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रविंद्र धारणकर, कार्यकारी अभियंता सतीश भामरे,बांधकाम विभाग चे उपअभियंता सुरेश पाटील, उद्यान विभागाचे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.