मोहाडी येथे आज दिनांक २४ ऑगस्ट ला अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुंरूगुंज आश्रम मोझरी येधुन ९ ऑगस्ट ला निघालेली क्रांतीज्योत यात्रेचे जल्लोष स्वागत मोहाडी येथे करण्यात आले यावेळी यात्रेचे स्वागत मोहाडी बस स्टाप चौकात मोहाडी येतील महिला गुरूदेव सेवा मंडळ द्वारे भजन कीर्तन व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यात्रा गांव भ्रमन करून श्रीराम मंदिर देवस्थान येथे सभा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र चौरागडे व इतर मान्यवर उपस्थित होते.