वसई पूर्वेकडील भीमपाडा परिसरात एका एलपीजी सिलेंडरला आग लागल्याची घटना घडली आहे. भीमपाडा परिसरातील गाळा नंबर तीन येथे पाच किलोग्राम एलपीजी सिलेंडरला जेवण बनवताना अचानक आग लागली घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि वेळीच आगीवर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.