बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शेतकरी भवन येथे 4 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डिगांबर खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविक विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे यांनी केले, सहाय्यक गटविकास अधिकारी डि.एम जाधव, गटविकास अधिकारी डिगांबर खरात यांनी मार्गदर्शन केले.