परतवाडा पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीचा आरोपी मध्यप्रदेशातून अटक करून दोन लाख रुपयांच्या ठगीचा पर्दाफाश केला आहे. सिव्हिल लाईन परिसरातील व्यापाऱ्याला तनिष्क कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली तब्बल १,९९,९९९ रुपये ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी गजाआड केले. आरोपीचे नाव रामकिसन कनिराम सोलंकी (३२, रा. चिखली सौध्या, जि. शाजापूर, मध्यप्रदेश) असे आहे. या प्रकरणी व्यापारी प्रदीप कराळे यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) व