रायगड पोलीस दलातर्फे फिट इंडिया व अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली कर्जत मार्गावर १० किमी सायकलिंग स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी हिरवा झेंडा दाखवत या स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक यांचा समावेश होता.