एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात २० ऑगस्ट रोजी शेतात घडलेल्या एका घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यात पती-पत्नी, त्यांची दोन मुले आणि सासू यांचा समावेश होता. आता एक महिना होत आला आहे. परंतू शासनाकडून अद्याप कोणतीही शासकीय मदत जाहीर झालेली नाही किंवा त्यांना मिळाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबातील सदस्यांनी बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे.