वारंगूशी फाट्यावर आज भर पावसात शेकडो आदिवासी महिला, सरपंच आणि नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केलं. अनेक वेळा पोलिसांना निवेदन देऊनही अवैध दारू विक्री सुरूच असल्याने संतप्त नागरिकांनी हा रस्ता रोको केला होता. यामुळे दोन तास पर्यटकांची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री थांबवण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला.