कळमनुरी शहरासह तालुक्यातील आखाडा बाळापूर,नांदापूर,डोंगरकडा,पोतरा,शेवाळा वारंगा वसई यासह सर्वच गावात आपल्या लाडक्या श्री गणेशाला निरोप देऊन आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे .आज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे .एकंदरीत उत्साहाच्या वातावरणात सगळीकडेच गणरायाला निरोप देण्यात आला आहे .