रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतून अपहार झालेल्या ५० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांपैकी २ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. हे सोन्याचे दागिने संशयित आरोपी बँकेचा शिपाई अमोल आत्माराम मोहिते राहणार टिके यांच्या घरातून मिळाले आहेत.