जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारातील विमानतळाजवळ असलेल्या दोस्ती पान सेंटरसमोर आरोपी हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवत तरूणाला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता केलेल्या धडक कारवाई करत अटक केली आहे. त्याच्या कडून गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शनीवारी ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.