22 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजता पारडी परिसरात यंदाचा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. पारडी आणि आसपासच्या गावांतून शेकडो बैलजोड्या या पोळ्यात सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना सजवून वाजत-गाजत मिरवणुकीत आणले होते.सकाळी बैलांना अंघोळ घालून त्यांची शिंगे रंगवण्यात आली. त्यांच्या अंगावर विविध रंगांची नक्षी काढण्यात आली होती. गळ्यात घुंगरूमाळा, पायात तोडे आणि सर्वांगावर मखमली झूल घालून त्यांना सजवण्यात आले होते.