दिनांक ५ सप्टेंबर रोजी सावरटोला येथे यादवराव पाटील तरोणे यांच्या शेतावर जीवामृत निर्मिती व त्याच्या वापराबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत गावातील कृषी सखी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेदरम्यान आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहळे, सहाय्यक कृषी अधिकारी भोजराम नखाते, कृषी उपअधिकारी पंकज सूर्यवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी विश्वनाथ खवासे, कृषी सखी उषा तवाडे, कृषी मित्र कालिदास पुस्तोडे व कृषी सखी चारुलता पुस्तोडे यांनी मार्गदर्शन केले