मोताळा तालुक्यातील लपाली येथे पत्नीने पोटातील बाळ पाडल्याची वार्ता कानी पडल्याने बाहेरगावावरून पत्नीला घेण्यासाठी आलेल्या पती व सासरच्या मंडळीत वाद होऊन पतीने विषारी औषध प्राशन करून मृत्यू झाल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी घडली आहे.बादल हवसु मंडाळे असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी इंदुबाई मुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रूपाली बादल मंडाळे, संजय जयराम भवर, लिलाबाई संजय भवर, अक्षय संजय भवर विरुद्ध धामणगाव बढे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.