कोपरगाव तालुक्यातील नाशिक-शिर्डी महामार्गावर मढी फाटा या ठिकाणी आज रविवार २ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. वेगात असलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या अपघातात भास्कर मधुकर माळी (वय ५०, रा. देर्डे) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.