कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांना पूर आला.चिकलठाण, निपाणी, टाकळी शाहू, लव्हाळी, कन्नड, गराडा व पिशोर या गावांत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 16 सप्टेंबर रोजी संजय आसाराम दळे (55) गांधारी नदीत वाहून गेले.19 सप्टेंबरला भारत रावसाहेब डगळे (38) शिवना नदीत पाय घसरून नदीत वाहुन गेले.23 सप्टेंबरला साहेबराव नथ्थू दहीहंडे (48) अंजना नदीत पडून वाहून गेले, तर 24 सप्टेंबरला आयन शेख खाजू (11) शिवना नदीत वाहुन गेला.निपाणीतील प्राचंल प्रकाश कदम (8) चिमणधडी नदीत वाहून गेले.