श्री श्री दुर्गापूजा समिती भामरागड यांचा वतीने भव्य रक्तदान तसेच आरोग्य व रक्त चाचणी शिबीराचे आज दि. 29 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुर्गा मंदिर समोरील मैदानावर करण्यात आले होते. शिबीरात नागरिक तसेच दुर्गापूजा समितीचा सदस्य असे एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी समीती व गावकरी असे एकूण जवळपास 50 ते 60 रुग्णाची आरोग्य तपासणी व रक्त चाचणी करण्यात आली.