वसई पोलीस ठाणे हद्दीत, कृष्णा जाधव या कामगाराचा एक्सेल एंटरप्राइजेस कंपनी येथे शॉक लागून मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर कंपनी मालक विल्यम डायस यांनी कामगाराला काम करण्यास प्रवृत्त केले व त्यांच्या निष्काळजीपणामुळे कट वायरचा शॉक लागून कामगार कृष्णा जाधव यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात निष्काळजी पणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.