अहेरी तालुक्यातील मोसम येथील महिला मीराबाई दस्सा नैताम (वय 45) या महिलेने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून त्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या. घटनेच्या वेळी त्यांचे आई-वडील जंगलात कामानिमित्त गेले होते. या संधीचा फायदा घेत घरातच त्यांनी गळफास घेतला.ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.