दोन सप्टेंबरला रात्री साडे आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, इमामवाडा हद्दीत टीबीवॉर्ड चौक येथे अभिजीत कोरे यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने ते गाडी उभी करून तेथे बेशुद्ध पडले असता अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी व आयफोन असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान आरोपी प्रणय चव्हाण याला अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी आणि आयफोन असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.