सीईओ च्या दालना बाहेर किनोळा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरवला क्लास"शिक्षक नाहीत म्हणून शिक्षण नाही, हे आम्हाला मान्य नाही” – अशी भूमिका घेत बुलढाण्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेरच शाळा भरवली. इंग्रजी आणि गणिताचे शिक्षक गेल्या सात वर्षांपासून नियुक्त न झाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले.