आज दि 5 सप्टेंबर दुपारी 2 वाजता शहरामध्ये गल्लोगल्लीमध्ये चरस गांजा विक्री होतो.शहरात गुन्हेगारी वाढत आहे अशी तक्रार खुद्द मंत्री संजय शिरसाठ यांनी शांतता समितीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांसमोर केली होती. मंत्र्यांच्या तक्रारीनंतर शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. विविध भागांमध्ये चरस गांजा विक्री करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकत त्यांची धिंड काढली जात आहे. नारेगाव भागामध्ये चरस विकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यानंतर जिथे दहशत निर्माण केली तिथेच हातकडी घालून गुडघ्यावर बसवलं