नांदुरा तालुक्यातील वडी येथील बावीस वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना ९ सप्टेंबरच्या सकाळी ११ ते ११.३० वाजता दरम्यान घडली.वडी येथील रहिवासी असलेले रमेश श्रीराम विठोकार यांची पत्नी व मुलगी वैशाली विठोकार (वय २२ वर्षे) हे डॉ.वानखडे यांच्या दवाखान्यात गेले होते. यावेळी मुलीने आईला छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणीपुरी खाण्यासाठी जाते, असे सांगितले. परंतु ती परत आलीच नाही. कुटुंबियांनी शहरात आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता,ती मिळून आली नाही.