केज तालुक्यातील धनेगाव येथील, मांजरा प्रकल्पकडून माहिती मिळाली आहे की, आज गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी धरणाची गेट क्रमांक २ आणि ५ प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आली आहेत. सध्या सहा गेटमधून पाणी सोडले जात असून मांजरा नदीपात्रात सुमारे ५ हजार २४१ क्युसेक्स म्हणजेच १४८ क्युमेक्स इतका विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाईल. नदीकाठावरील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पुरनियंत्रण कक्षाने केले आहे.