आज दिनांक 2 जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांना हाताशी धरून वक्फ बोर्डाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांसह मदत करणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक साबळे विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी मागणी विशेष पोलीस महानिरिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेख जावेद शेख बाबु यांनी केली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात शेख जावेद शेख बाबु यांनी म्हटले आहे की, 2012 पासून सदर जागेवर भाडेकरू असून गैरअर्जदाराने पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण करत खोटे गुन्हे दाखल केले आह