मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण असा अपघात घडला आहे. चारोटी नजीक रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने महिलेला जोरदार धडक दिली, या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. सदर मृत महिलेची ओळख पटलेली नसून अधिक तपास पोलीस करीत आहेत.