उदगीर शहरातील गणपतीचे २ सप्टेंबर रोजी विसर्जन होणार असून विसर्जनाच्या ठिकाणी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे, उदगीरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ठीक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून पोलीस प्रशासनाचे सर्व बाबीवर बारकाईने लक्ष आहेत उदगीर शहरातील मानाचा असलेल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गुलाल उधळत सुरुवात करण्यात आली,शहरातील सर्व गणपतीचे आज मोठ्या थाटामाटात विसर्जन पार पडणार आहे