पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकानजीक रेल्वे रूळ ओलांडतांना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला. राजेंद्र भोईर असे मृत तरुणाचे नाव असून जलसार परिसरातील रहिवासी होता. या घटनेची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.