राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पक्ष कार्यालयात आयोजित ‘जनता संवाद’ कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमात नागरिकांनी विविध प्रश्न, अडचणी व मागण्या मांडल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सामान्य जनतेच्या अपेक्षा आणि समस्यांवर संवेदनशीलतेने चर्चा केली.