माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत राहणार; आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर..सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर समाजातील वंचित , दुर्लक्षित घटकांना जवळ घेऊन प्रसंगी आक्रमक भूमिका घेत त्याचे प्रश्न सोडवतात. जर आम्ही दोघांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या नाहीत तर आम्हाला विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत. त्यामुळे गोपीचंद पडळकर सारखे नेतृत्व जपले पाहिजे आणि ते मोठं केलं पाहिजे. मी तर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर समवेत असेन असे म्हणत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर झाले. वा