हल्लेखोर वानर भाटवडेतून जेरबंद.प्राणिमित्रांची कामगिरी :वनविभागाच्या केले स्वाधीन.. भाटवडे गावात ग्रामस्थांवर हल्ले करणाऱ्या वानराला यादव वस्ती येथे यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आले. वनविभागाच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. हे वानर महिला, लहान मुले, शेळ्यांवर हल्ला करत होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती होती. वनविभागाच्या वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी व वनपाल दादासाहेब बर्गे व वनरक्षक अश्विनी वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक प्राणीमित्रांच्या सहकार्याने वानराला जेर