मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, निदर्शनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मनोज जरांगे यांची आहे. आम्ही त्यांना वारंवार मोर्चाची तारीख बदलण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. आता, जर काही गोंधळ झाला तर त्यांना संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल.