आज 5 सप्टेंबर ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी भेट दिली असता रक्तपेढीची मागणी त्यांच्यासमोर आली. त्यावेळी तालुक्यातील रुग्णांची हेळसांड आणि आरोग्य विषयक अडचण बघता लवकरच रक्तपेढी मेहकर शहरात आणणार तसा प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांना तयार करण्यास सांगितला आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.