प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लोणार शहरात 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधव, युवक, प्रतिष्ठित नागरिक तसेच चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक मिरवणुकीत सहभाग घेतला.शहराच्या मुख्य चौकातून निघालेल्या या मिरवणुकीत युवकांनी घोषणाबाजी करत, हातात झेंडे फडकवत व ढोल-ताशांच्या गजरात वातावरण उत्साहमय केले.