सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून पालघर पोलीस दलाने नागरिकांचे हरवलेले 20 लाख 40 हजार रुपये किमतीचे एकूण 104 मोबाईल हस्तगत केले आहेत. तांत्रिक तपास आणि मानवी गुप्तचर यंत्रणेचा योग्य वापर करून पालघर पोलीस दलाने सदरची कामगिरी केली असून पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलिसांनी हस्तगत केलेले मोबाईल नागरिकांकडे सुपूर्त करण्यात आले.