हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे आणि येलो मोजॅक रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे विधानसभा श्रेत्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उपविभाग अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पेटविलेल्या निवेदनातून केली.या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की. सोयाबीन,कपाशी व तुरीसारखी मुख्य पिके उद्ध्वस्त झाली आहे.