फिर्यादी रिता शंकर कुमरे यांच्या तक्रारीनुसार 18 ऑगस्टला फायनान्स वाले आरोपी नरेंद्र पैठणकर यांच्या घरी गेले असता आरोपी नरेंद्र पैठणकर व आणखी तीन अशा चौघांनी फिर्यादी सोबत तू फायनान्स वाल्यांना माझे घर का दाखविले असे म्हणून वाद करून लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी 20 ऑगस्टला अवधूतवाडी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.