सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप प्रभाग रचना झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे आणि काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची गुरुवारी दुपारी 3 वाजता काँग्रेस भवनामध्ये भेट झाली. यावेळी माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल शहराध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आदी उपस्थित होते.