धारूर तालुक्यातील मोहखेड गावात, रविवारी दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला विचारवंत सिद्धार्थ शिंगारे, वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, अॅड. राजेश शिंदे तसेच वंचितचे ऊसतोड कामगार नेते राणब उजगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात मान्यवरांनी आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण करून दिली आणि त्यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले.