विरार येथील इमारत दुर्घटनेत इमारतीच्या ढिगार्याखाली दबले गेल्याने नऊ जण जखमी झाले. जखमींना वसई विरार नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. यावेळी जखमींच्या प्रकृतीबाबत त्यांनी विचारणा केली व त्यांच्याशी संवाद साधला. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.