ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक सुरळीत करीत असताना एका बसमधील तरुणाने ट्रॅफिक वॉर्डनला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी ट्रॅफिक वॉर्डन अनिल साह (रा. पिंपरी कॅम्प) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर राजू चिंचवले (रा. केसनंद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.