चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येचा तपास पोलिसांनी यशस्वीपणे केला असून, या प्रकरणी त्याचाच मित्र आरोपी असल्याचे समोर आले आहे. मृत निखिल हिरामण सूर्यवंशी (वय २८) याचा धडावेगळा केलेला मृतदेह कन्नड ग्रामीण पोलिसांना गौताळा अभयारण्यातील सायगव्हाण गावाच्या हद्दीत, सनसेट पॉईंटजवळील जंगलात सापडला होता. पोलिसांनी या घटनेचा अत्यंत गांभीर्याने तपास सुरू केला आणि अवघ्या चार दिवसांत या प्रकरणाचे गूढ उकलले.