मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. पंढरपूर तालुक्यातील मराठा बांधवांनीही मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. मात्र, मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांची गैरसोय सरकारकडून जाणूनबुजून करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खाण्यापिण्याची सोय नाकारली जात असून दुकाने आणि खाऊगल्ली बंद ठेवण्यात आल्याने संताप केला.