मी आज तुमच्यामुळे जिवंत आहे... आपण सहकार्य केलं नसतं तर मी आज या जगात नसते'... हे शब्द आहेत ११ वर्षांच्या वैष्णवीचे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तिच्या बालपणी अत्यंत क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया आणि अवघड अश्या उपचारासाठी केलेली मदत वैष्णवीने लक्षात ठेवली. आणि आपल्या जीवनाचे रक्षण करणाऱ्या नेत्याला भेटल्यानंतर भावनांना वाट मोकळी करून दिली. हे शब्द ऐकताच आ. श्री. मुनगंटीवार देखील भारावून गेले.