मानोरी परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ग्रामस्थांत भीतीचं सावट पसरलं आहे.आज सोमवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढवून दोन कालवडींचा बळी घेतला. आसिफ हमाजेखाँ शेख यांच्या घरासमोर बांधलेल्या कालवडींवर पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला. ग्रामस्थांनी बाहेर धाव घेतली असता बिबट्याने कालवडी फाडल्याचं दृश्य पाहून खळबळ उडाली आहे.