भारतीय जनता पार्टी पेठ तालुका कार्यकारिणी ची तालुका स्तरीय बैठक ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांचे उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी 17 सप्टेबर पासून साजरा करण्यात येणाऱ्या सेवा पंधरवाडा संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे सर्व आघाड्यांचे प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.