महाराष्ट्रातील आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. सरकार मूक, बहिरं आणि आंधळं झाल्याची काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. भाजपावर राज्यात अराजकता निर्माण करण्याचा कुटील डाव रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीनिहाय राजकारण करून समाजात आणि धर्मामध्ये भांडणं लावली असल्याचा आरोप त्यांनी केला एवढेच नव्हे तर दहा वर्षांपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं