नगर -मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज सायंकाळी पुन्हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ जवळ खड्डे हुकविण्याचे नादामध्ये एका पिक व्हॅन जागीच पलटी झाली आहे.त्यामधे चालकासह एक जन किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने मात्र जीवित हानी टळली आहे. आज शनिवारी सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कृषी विद्याजवळ हा अपघात घडला आहे