धुळे तालुक्यातील नाणे शिवारात ४० वर्षीय नारायण काळू भिल यांनी लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने खाली उतरवून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान रात्री ११ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धुळे तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास सुरू आहे.