अमळनेर शहरातील संताजी नगरात राहणाऱ्या एका तरूणाचे बंद घर फोडून घरातून रोकड आणि चांदीच्या वस्तू असा एकुण १९ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याबाबत गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.